दौंड मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
बारामती,दि 12: परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान पुस्तकाचे तोडफोड काही समाजकंटकांनी केल्याने त्यांच्या निषेधार्थ स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने आज दि १२ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री/गृहमंत्री यांना बारामती चे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे, त्या निवेदनात संविधान पुस्तकाचे तोडफोड करणाऱ्या जातीयवादी समाजकटकावर राजद्रोहाचा गुन्हा , नार्को टेस्ट करण्यात यावी म्हणजे या घटनेचा खरा मास्टर माईंड सापडेल,आठ दिवसांत महाराष्ट्र शासनाने जातीयवादी समाजकटकावर राजद्रोहाचा गुन्हा ,व नार्को टेस्ट न केल्यास स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ करुणाजी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा प्रशांत विष्णु सोनवणे यांनी सांगितले, त्या वेळी स्वराज्य शक्ती सेनेचे बारामती तालुका अध्यक्ष मा महिबुब सय्यद, मा विठ्ठलभाऊ सोनवणे माळेगाव शहाराध्यक्ष,मा सा रमेश संभुदेव कुंभार बारामती तालुका उपाध्यक्ष,मा अजय आण्णा चौधरी बारामती तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते,