मुकनायक प्रतिनिधी:विजय बगाडे
दौड, दि.6 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दौंड शहरामध्ये सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व भीम अनुयायी एकत्रित येऊन डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली व त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेण्यात आली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या आणि संध्याकाळी ६:३० वाजता कॅण्डल रॅली काढण्यात आली व ७:०० वाजता भीम संध्या भीम गीतांच्या माध्यमातून महामानवला आदरांजली वाहण्यात आली हा कार्यक्रम स्थानिक गायक यांच्याकडून गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला अखिल भारतीय कलाकार महासंघ यांच्या विद्यमानाने दौंड शहरातील व तालुक्यातील भीम अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित होते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आशी आदरांजली वाहण्यात आली महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम भीम संध्या भीम गीतांची कार्यक्रमाचे आयोजक पॅंथर जयदीप बगाडे , भारत सरोदे , असून प्रमुख पाहुणे माजी तहसीलदार श्रीकांत शिंदे संजय आढाव नागसिंग धेंडे सागर जगताप यादव जाधव राजू जाधव अभिजीत शिंदे बी वाय जगताप आणि दौंड शहर तालुक्यातील असंख्य भीम अनुयायी या कार्यक्रमा वेळी उपस्थित होते ,