धाराशिव, दि.14: मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वरचेवर गंभीर होत चाललेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः कळंब तालुक्यातील ३१ गावांमध्ये रूप-टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प यशस्वी राबविला गेला आहे .त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल हा प्रश्न सोडविण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने अर्थसहाय्य केले असून कळंब तालुक्यातील 31 गावात शासकिय इमारती शाळा, मंदिर, ग्राम पंचायत, वाचनालय, सभागृह, सह जवळपास एक हजार सत्तावीस ठिकाणी हे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविलेली आहे . म्हणजे ९.३५ लाख चौ.फूट छतावर प्रत्येक वर्षी पडणारे जवळपास ३.७२ करोड लिटर पावसाचे पाणी तेथील ६२० बोअरवेल आणि ६१ विहिरी मधून व १०९७ घरावरील लावण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ने भुजलात सोडले जाईल यामुळे ही ३१ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी माहिती श्री कर्नल शशिकांत दळवी साहेब यांनी दिली आहे. भावी पिढीसाठी पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे असे मत सेवानिवृत्त कर्नल शशीकांत दळवी यांनी व्यक्त केले आहे.कळंब तालुक्यातील वडगाव जहागीर येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंढे होते. यावेळी आयसीआय सीआय बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री शैलेश झा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर, मॅप्स इंडस्ट्रीज( ई) प्रा. लि. पुणे व पर्जन्य कन्सल्टन्सी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयसीआयसीआय बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमास गावातील नागरिक , शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शैलेश झा, राजू तेली, यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक परिवर्तनचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले तर सूत्र संचलन लालासाहेब यांनी केले आणि आभार प्रदर्शन संजय जाधव यांनी केले