मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे
कोल्हापूर, दि. 7 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सन 2024-25 पासुन ऑनलाईन पोर्टलवर करण्यात आली असून या पोर्टलची लिंक https://humas.mahait.org ही आहे. दि. 26 डिसेंबर 2024 नुसार ही योजना तालुकास्तरावर करण्यात आली असून या योजनेचे अर्ज भरण्यासाठी दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका व महानगरपालिका हद्दीपासून ५ कि.मी. परिसर व तालुकास्तरावर असणाऱ्या हद्दीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत. संबंधित महाविद्यालयांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील आपल्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांचे या योजनेबाबतचे अर्ज https://hmas. mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन भरावेत. याबाबत तालुक्यातील नजिकच्या शासकीय वसतीगृहात संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.