मूकनायक : चांदू मोरे
महागाव :- दि. २९/८/२०२१ रोजी महागाव जिल्हा. यवतमाळ येथे श्री काशिनाथ खरवडे यांच्या घरी बिरसा क्रांती दलाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकीमध्ये( बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष) डी.बी अंबुरे यांनी बिरसा मुंडा नागरी सहकारी पतसंस्था व बिरसा क्रांती दलाची समाजात काम करण्याची पद्धत याविषयी उपस्थित सर्व समाज बांधवांना माहिती दीली. बिरसा क्रांती दल युवक आघाडी ची स्थापना करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
या बैठकीला महागाव शहरातील खालील मान्यवर उपस्थित होते. काशिनाथ खरवडे (अध्यक्ष ,बिरसा क्रांती दल तालुका महागाव), गजानन शेडमाके (उपाध्यक्ष तालुका महागाव), विठ्ठल पोटे (अध्यक्ष उमरखेड शहर) अशोक मुरमुरे, भाऊराव व्यवहारे ,अजिंक्य दलसिंगारे, विलास दल सिंगारे, परशराम ससाने, बाबुराव खंदारे, अमृत अंभोरे, समाधान वानोळे, रवी डवले, संतोष खंदारे ,अंकुश फोपसे ,उपस्थित होते.