प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ सप्टेंबर २०२४ गेली अनेक वर्ष पक्ष संघटना आणि स्मारक समित्या यांनी पाठपुरावा करून सतत त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मारका विषयी लढा चालू होता. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आश्वासन देऊन दिलेल्या आश्वासनाचे पालन करत नव्हते परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्ष संघटना धार्मिक संस्था बुद्धविहार समित्या यांचे सर्व सदस्य एकत्र येऊन बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर या नावाने “आमरण उपोषण” करण्याचे ठरवले व या उपोषणास लाभलेले उपोषणकर्ते राजू गायकवाड व रामभाऊ ठोके यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले व तसा पूढाकार ही घेतला.
यात मूळ समस्या होती ती आर्थिक मदतीची ती मदत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बौद्ध बांधवांनी पूर्ण केली व लढा उभारला तारिख ही ठरली १९ सप्टेंबर.
मूळ मूद्दा असा की या अगोदर अनेक वर्ष धरणे आंदोलन करून ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फक्त आश्वासनेच दिली. परंतु बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची दखल पालिका प्रशासनाने घेऊन येत्या सात तारखेला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त
PMPML व्यवस्थापक व बौद्ध समाज बांधव यांची मीटिंग महानगरपालिकेमध्ये घेण्याचे लेखी स्वरूपात पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यानी उपोषण स्थळी येऊन सर्व अटी मान्य करून उपोषण स्थगीत करायला सांगीतले. त्या प्रमाणे उपोषणकर्त्यांनी फळांचा रस घेऊन आमरण उपोषण स्थगित केले. हे बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांचे सर्वात मोठे यश आहे या कार्यास पाठिंबा देणाऱ्या सर्व संस्था पक्ष धार्मिक संघटना बुद्ध विहार समित्या पत्रकार बांधव यांचे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने शतशा; धन्यवाद.
त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामास सुरुवात होईपर्यंत हा लढा असाच निरंतर चालू राहील. असे समाजबांधवानी यावेळी सांगीतले.
महामानवांचे नावे घोषणा देत अमरण उपोषणास स्थगित करण्यात आले.
शेवटी लढेंगे जितेंगे असे म्हणत अमरण उपोषण उपस्थितांचे धन्यवाद मानत स्थगित करण्यात आले.