Monday, December 23, 2024
Homeताज्या बातम्यासामाजिक संघटनांनी केले पिंपरीत जोडे मारो आंदोलन.

सामाजिक संघटनांनी केले पिंपरीत जोडे मारो आंदोलन.

संभाजी ब्रिगेडसह शहरातील विविध संघटनांनी भाजपचा गुंड शिरवडकरच्या प्रतिमेस जोडे मारून केले निषेध आंदोलन.

वरीष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पिंपरी चिंचवड दि. ११ ऑक्टोंबर २०२४ अभिव्यक्ती स्वातंत्र्यास विरोध करून चित्रलेखाचे संपादक साहित्यिक पत्रकार प्रबोधनकार व्यक्तीमत्व ज्ञानेश महाराव यांना एकटे गाठून दमबाजी करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न मुंबई भाजपचा गुंड पदाधिकारी राजेश शिरवडकर व त्यांच्या सहकार्यांनी दोन दिवसापूर्वी केला होता. या बद्दल महाराष्ट्र सरकार व गृह विभागाने शिरवडकर वर कोणतीच कारवाई केली नाही. उलट या गुंड शिरवडकर व त्याच्या सहकारी यांना सरकारने पाठबळ दिले. याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील संभाजी ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शुक्रवार दि.११ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करून भाजपचा मनुवादी गुंड राजेश शिरवडकरच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारूती भापकर, प्रकाश जाधव, अंजुम इनामदार, धम्मराज साळवे, सचिव देसाई, सिद्धिकभाई शेख, सयाजी भांदिगरे यांनी मनोगते व्यक्त करून निषेध केला. दोन महिन्यांपूर्वी जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी एका कार्यक्रमात रामायणातील व इतर काही बाबींवर आपले विचार व्यक्त केले होते. याबाबत काही लोकांनी आक्षेप घेतला होता. यावर ज्ञानेश महाराव यांनी खुली चर्चा करण्याचे आवाहन केले होते. पण ते न स्विकारता मनुवादी गुंड राजेश शिरवडकर, त्यांची पत्नी व इतर सहकारी यांनी ज्ञानेश महाराव यांना एकटे गाठून दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना माफी मागायला लावली. याच शिरवडकरच्या पत्नीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून महाराजांचा अवमान केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. याविषयी सरकारने शिरवडकर व त्याच्या पत्नीवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट ज्ञानेश महाराव यांनी जेम्स लेन प्रकरणात आवाज उठवला. शिव सन्मान जागर परिषदा घेऊन शिव द्रोहयांचे बिंग फोडले होते. याचा या सनातनी लोकांना राग होता. यातूनच सदर प्रकार घडला. या निषेध आंदोलनावेळी शिरवडकर पती पत्नी व त्यांच्या सहकारी मनुवादी गुंडांवर गुन्हा दाखल करून अटक करावी व ज्ञानेश महाराव यांना संरक्षण द्यावे. या मागण्या करण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे, सचिव मुकेश बोबडे, उपाध्यक्ष सुभाष जाधव, संघटक महेश कांबळे, मुळशी तालुकाध्यक्ष माऊली शिंदे, नरेंद्र बनसोडे, गिरीश वाघमारे, वसंत पाटील, अशोक सातपुते, सुलभा यादव, रत्नप्रभा सातपुते, कौशल्या जाधव, दिपक खैरनार, राजश्री शिरवळकर, हमिदभाई शेख, निखिल गणुचे, रमेश कदम, अनंत शेवाळे, लहू अनारसे, विशाल सरवदे, सुरेश भिसे, विकास सूर्यवंशी, किरण खोत, पांडुरंग परचंराव यांच्यासह विविध संघटनांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments