मुकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन
पुणे, दि.१४ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र विभागातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांची बैठक नवीन सर्किट हाऊस विभागीय आयुक्त बंगल्या समोर बार्टी ऑफिस पुणे येथे पार पडली. या बैठकीत EVM घोटाळ्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली व हा घोटाळा सामान्यजनतेपर्यंत सहज सोप्या भाषेत कसा पोहचेल याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, मतदानाच्या दिवशी एकूण किती मतदान झाले आणि मोजणीच्या दिवशी किती मतदान मोजले गेले, तसेच मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजलेनंतर प्रत्येकी बूथ प्रमाणे मतदान केल्यानंतर किती टोकण देण्यात आले यांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज करून घ्यायचे आदेश राष्ट्रीय अध्यक्षांनी दिले आहेत. तसेंच झालेल्या निवडणुकींचा अहवाल सादर करून आगामी *महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची तयारी करन्याबद्दलचे मार्गदर्शक सुचना* दिलेल्या आहेत. पुणे येथील या बैठकीत वंचित बहुजन आघाडी चें पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा उमेदवार उपस्थित होते…