Sunday, December 22, 2024
Homeदौंडपरभणी येथील झालेले संविधान प्रतिकृतीची विटंबना व हल्ल्यात शहीद सोमनाथ सूर्यवंशी...

परभणी येथील झालेले संविधान प्रतिकृतीची विटंबना व हल्ल्यात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू निषेधार्थ दौंड कडकडीत बंद ,

प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड, दि.17: परभणी मध्ये संविधान प्रतिकृतीची विटंबना केलेल्या हिंसाचारात पोलिसांनी अटक केलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याचे राज्यात वृत्त समजताच भीमसैनिक सविधान प्रेमी मध्ये तीव्र स्वरूपाची तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणीत हिंसाचार प्रकरणी ११ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होते त्यांचा न्यायालयीन कोठडीत होते त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्याची वार्ता समजताच त्याचे पडसाद दौंड मध्ये ही उमटले आज दिनांक 17 /12/ 2024 रोजी दौंड मध्ये सकाळी ठीक अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सर्व भीमसैनिक व संविधान प्रेमी एकत्रित येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले परभणी येथील झालेल्या हल्ल्यात शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहे गृह खात्याच्या हलगर्जीपणामुळे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू झाल्यामुळे दौंड तालुक्यातील सबंध बंद पाळण्यात आला संविधाना प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे सर्व भीमसैनिक एकत्रित असंख्य हे रस्त्यावर उतरले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणाबाजी करण्यात आल्या परभणी येथील ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याला मारले आहे त्यांना तात्काळ अटक करा व ज्या भीमसैनिकांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घ्या यामुळे दौंड शहरात कडकडीत बंद करण्यात आला होते व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी असंख्य भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकत्रित सर्व येऊन या घटनेचा निषेध नोंदवले आहे आणि दौंड पोलीस स्टेशन चे निरीक्षक यांना एक निवेदन देण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments